- पोलिसात तक्रार दिल्याचे कारण; पिंपळे गुरवमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२१) :- फिर्यादीने आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्या कारणावरून आरोपी कोयता घेऊन दुचाकीवरून आला. भर रस्त्यात त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करत ‘तुला आता मारल्याशिवाय राहणार नाही. तुला कुठे जायचे तिथे जा’ अशी धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादी यांच्या आईला देखील शिवीगाळ केली. फिर्यादी पुन्हा आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपीने पुन्हा फिर्यादी यांना अडवून शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (दि. १७) रात्री आठ वाजता सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथे घडला.
सुचिता संतोष झावरे (वय २०, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रवी भोकटे (रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
















