न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जाने.) :- केमिस्ट असोसिएशन पिंपरी चिंचवडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही देहूरोड येथील व्ही. डी. आर. या क्रिकेट मैदानावर भव्य क्रिकेट लीग २०१९ स्पर्धेच आयोजन केले होते.
या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात केमिस्ट क्रिकेट संघ सहभागी झाले होते. संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ८:०० वा. सर्वात जेष्ठ केमिस्ट जगदीश जमतानी, वेदप्रकाश गुप्ता, संजय गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा केमिस्ट पदाधिकारी नंदू सांडभोर, कैलास दवे, अप्पा बिबवे, रामभाऊ गायकवाड, जयेश छाजेड, संदीप पारेख, संघटनेचे अजय दर्डा, प्रवीण मुथा, कटारिया, मदन चौधरी, रवी कटारिया, राजू बाफना, प्रांजळ पाटील, राहुल शेंडगे, विशाल मुरकुटे, दीनदयाळ गुप्ता, अक्षय लुंकड, धनेश मुनोत, नरेंद्र आगरवाल, जगदीश चौधरी, गिरीश बाफना, नरेंद्र आगरवाल, प्रसाद शितोळे, धनेश बोरा, सतीश लोहकरे, शशिकांत माने, दीपक भागे आदी मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक होलसेल संघ चिंचवड यांनी पटकावले. त्रिवेणीनगर या केमिस्ट संघाने द्वितीय बक्षीस पटकावले.
मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट प्लेयर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट झेल, अप्रतिम रण आउट, आदी पारितोषिके देण्यात आली.
पारितोषिक वितरण समारंभास अन्न औषध प्रशासन निरीक्षक सचिन कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रथम व द्वितीय पारितोषिक देण्यात आली. संपूर्ण स्पर्धा यु-ट्यूब वर लाईव्ह होत्या. स्पर्धा अत्यंत शांततेत व जल्लोषात पार पडल्या. उर्वरित पारितोषिके केमिस्ट पदाधिकारी व सभासद यांच्या हस्ते देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व केमिस्ट मधुकर बच्चे यांनी केले. पिंपरी चिंचवड केमिस्ट असो. अध्यक्ष, स्पर्धा मुख्य आयोजक संतोष खिवंसरा यांनी सर्वांचे आभार मानले. स्पर्धेचे समालोचन सुरज चौधरी व मधुकर बच्चे यांनी केले.











