- आठ वर्षात तब्बल आठ गुन्ह्यात होता फरार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२१) :- पोलिसांना गुंगारा देऊन बिहारला पळून गेलेला आरोपी प्रथम चिखली, पिंपरी परिसरात असल्याची माहिती युनिट चारच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तपास सुरू केला असता तो तिथे मिळून आला नाही.
अखेर सदर आरोपी हा पिंपळे सौदागर येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आठ गुन्ह्यात मागील आठ वर्षांपासून तो फरार होता. दयानंद झा (रा. बिहार) असे अटक आरोपीचे नाव आहे.