- वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२१) :- थेरगाव येथील गुजरनगर उड्डाणपूल येथे आरोपींनी महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे जाहिरात लावली. जाहिरात लावून आरोपींनी उड्डाणपुलाचे विदृपण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बुधवारी (दि. २५) सकाळी हा प्रकार घडला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य निरीक्षक सुरेश भवरलाल चन्नाल यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत सार्वजनिक मालमत्तेचे विरूपणास प्रतिबंध कायदा कलम ३ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रमोद अमोल पारसुकर, साक्षी लोखंडे (रा. कुंदननगर, कासारवाडी), अशी आरोपींची नावे आहेत.