- वनविभागाची चिंचवडमध्ये कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२१) :- चिंचवड येथील पूर्णानगरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची विक्री होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाने बनावट ग्राहक पाठवून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून व्हेल माशाची उलटी सदृष्य ३ किलो ग्रॅम पदार्थ आणि एक कार जप्त केली आहे.
ही कारवाई शनिवारी (दि. २८) रोजी दुपारी करण्यात आली. मुहमदनईन मुटतअली चौधरी (वय ५८), योगेश्वर सुधाकर साखरे (वय २५, रा. बालेवाडी), अनिल दिलीप कामठे (वय ४५, रा. फुरसुंगी), जोतिबा गोविंद जाधव (वय ३८), कृष्णात श्रीपती खोत (वय ५९) आणि सुजाता तानाजी जाधव (वय ४४) असे अटक आरोपींची नावे आहेत.
खोल समुद्रात सापडणारा स्पर्म व्हेल हा संरक्षित घटक आहे. त्यामुळे स्पर्म व्हेलची शिकार किंवा त्यांच्याशी निगडीत कोणत्याही घटकाची विक्री करण्यास बंदी आहे.