- नगरसेविका सविता खुळे यांचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२१) :- नगरसेविका सविता बाळकृष्ण खुळे यांच्या वतीने रहाटणीत ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात रक्तातील साखर, ब्लड प्रेशर, तसेच ४५ वर्षावरील स्त्रियांची मासिक पाळी याबाबत तपासण्या व उपचार करण्यात आले.
यावेळी नगरसेविका सविता बाळकृष्ण खुळे, डॉ. तपशाळकर (प्रभारी वैद्यकीय अधिकारी), डॉ. शिंगाडे (फिजीशीयन), अर्चना पाटील (वैद्यकीय अधिकारी), (स्टाफ नर्स) अर्चना भोकरे, (ए एन एम) पुनम खुणे, शहाजी जमदार (फार्मासिस्ट), स्नेहा गजमल (लॅब टेक्नीशियन), आमित जाधव, आशा वर्कर दुर्गा थोटे, (एम,पी, डब्लु) लाला खरात, मंगल लोंढे (वार्ड आया) आदी उपस्थित होते.












