- घरच्यांना जिवे मारण्याची, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२१) :- पिंपरीत एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २७) रात्री चिंचवड परिसरात घडली आहे.बंद पडलेल्या बांधकाम साईटवर अल्पवयीन मुलीला नेऊन तिथे तीन नराधमांनी सामुहिक तिच्यावर अत्याचार केला.
आरोपींनी मुलीला कुठेही वाच्यता केल्यास तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच दुष्कृत्य करतानाचा व्हिडिओ वायरल करण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. पीडित मुलगी प्रचंड घाबरलेली असल्याने तक्रार देण्यास तयार नव्हती.
पिडीत मुलीच्या आईने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील दोन आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी खून, चोरी, जबरी चोरी, घरात घुसून विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.