- त्रासाला वैतागून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२१) :- मृत तरुणाचे आरोपी तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, तरुणाशी असलेले प्रेमसंबंध तिने तोडले. त्यानंतर इतर आरोपीने तरुणाला शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तरुणाने २७ ऑगस्ट रोजी मारुंजी येथील ओयो फ्लॅगशिप हॉटेल येथे नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पंकज श्रीकृष्ण उबाळे (वय २०, रा. वाघाळा, परळी वैजनाथ, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मृत तरुणाचा मामा यांनी सोमवारी (दि. ३०) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एकनाथ सावंत, सत्यजित सावंत, उद्धव सावंत, अनिरुद्ध सावंत आणि प्रेयसी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे तपास करीत आहेत.












