न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२१) :- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले एजुकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून दहीहंडी उत्सवात साजरी करण्यात आली.
स्कूलचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात आली. यावेळी विद्यार्थी राधाकृष्णाची वेशभुशा धारण करून ‘गोविदा आला रे आला, गोविदा रे गोपाळा’ या गाण्यावर नृत्य करत दहीहंडीत उत्सवात सहभागी झाले होते. श्रीकृष्णाच्या बाललीलाबद्दल माहिती तसेच पाळणा व आरती गायली.
यावेळी शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका आसावरी घोडके, विद्यार्थ्यी, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग व कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या मदतीने गोविंदाने दहीहंडी फोडली.
रिटा राजभोर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर, रेणू राठी यांनी आभार मानले.












