न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२१) :- चिंचवड येथील सायिनकर इमारतीत शांतीनिकेतन नावाचे कपड्याचे दुकान आहे. रविवारी (दि. २९) रात्री दहा वाजता फिर्यादीने दुकान बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश केला.
दुकानातील लाकडी कपाटाचे लाॅक तोडून एक लाख ९८ हजार रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. संदेश शांतीलाल चोपडा (वय ३३, रा. लिंकरोड चिंचवडगाव) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रणवरे तपास करीत आहेत.












