- रुपीनगरमधील दुर्दैवी घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२१) :- पडद्याशी खेळत असताना अचानक चिमुरडीच्या गळ्याभोवती फास अडकला. काही कळायच्या आत चिमुरडीचा तडफडून मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
ही घटना रविवारी (दि. २९) दुपारी अडीचच्या सुमारास रुपीनगर, तळवडे येथे घडली. सुमैय्या सफिल शेख (वय ८, रा. रुपीनगर) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास सुमैय्या दरवाजाच्या हँगरला बुरख्याचा झोपाळा करून झोका खेळत होती.
मुलीचे वडील कामावर गेले होते. आई खरेदीसाठी पिंपरी येथे गेली होती. सुमैय्या मोठ्या बहिणींसोबत घरातच होती. सुमैय्या एका खोलीत आणि तिच्या बहिणी दुसऱ्या खोलीत होत्या. चिखली पोलीस तपास करीत आहेत.












