- आम्हाला विचारात घ्या; अन्यथा आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल..
- रिपब्लिकन युवक आघाडीच्या मार्गदर्शन मेळाव्यात कुणाल वाव्हळकर यांची गर्जना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२१) :- भारतीय जनता पार्टी सोबत केंद्रात व राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाची युती आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकाचे बिगुल वाजले आहे. येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकात भारतीय जनता पार्टीने आम्हाला विचारात घेतलं नाही तर आम्हालाही विचार करावा लागेल अशी गर्जना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शहर युवक अध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी केली.
रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (आठवले) पक्ष युवक आघाडीच्या वतीने भव्य मार्गदर्शन मेळावा बर्डव्हॅली हॅाटेल वाकड येथे पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन.रि.पा.ई. पुणे जिल्हा अध्यक्ष तथा प्रभारी मा.सुर्यकांतजी वाघमारे व.रि.पा.ई.महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत यांनी केले. मेळाव्याचे आयोजन स्वतः वाव्हळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.
वाव्हळकर म्हणाले,बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाने चळवळीला खूप आधार दिला आहे.काही वर्षांपूर्वी रिपब्लिकन चळवळ मोडकळीस आली होती परंतु तिला जिवंत करण्याचे काम मा केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी केले आहे.रिपब्लिकन आठवले पक्ष हा सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे.रिपब्लिकन पक्षाने सर्व समाजाला घेऊन सोबत चालावे हे बाबासाहेबांच स्वप्न साकार करायचे आहे. कुठेही समाजावर अन्याय होईल तिथे मी जाऊन अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करणार.वाकड परिसरात रिपब्लिकन पक्षाची ताकद निर्माण झाली आहे.त्यामुळे वाकड मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा नगरसेवक निवडून यावा अशी इच्छाही त्यांनी सर्व नेत्यांसमोर बोलून दाखविली.ही चळवळ बाबासाहेबांची चळवळ आहे ऐऱ्या गैऱ्याची नाही. न्याय हक्कासाठी भारतीय जनता पार्टी वंचित ठेवत असेल व आमचा विचार करत नसेल तर आम्हालाही विचार करावा लागेल असे भूमिकाच त्यांनी याठिकाणी घेतली.उपस्थित राहिलेल्या सर्वांचे यावेळी वाव्हळकर यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी अजिजभाई शेख वाहतुक आघाडी महा प्रदेश अध्यक्ष खाजाभाई शेख अल्पसंख्यक (महा प्रदेश उपाध्यक्ष) रि.पा.ई.पिं.चिं.शहर कार्यअध्यक्ष )राजु उबाळ. रि.पा.ई. (पश्चिम महा उपाध्यक्ष )सम्राट जकाते, रिपब्लिकन एम्प्लॉईजफेडरेशन चे पुणे जिल्हा अध्यक्ष कामगार नेते विनोदजी चांदमारे मा.शेखलाल नदाफ (अल्पसंख्यक आघाडी पिं.चि.शहर अध्यक्ष ) रि.पा.ई.विद्यार्थी अध्यक्ष सुजित कांबळे रि.पा.ई.शहर उप्धक्ष मा.विलास गरड.यांनी ही मार्गदशन केले. अगामी महापालिका निवडणुकीचे रनशिंग फुकन्यात आले , हा मेळावा यशस्वी करन्यासाठी मनापासुन कष्ट केलेले पिंपरी चिचवड युवक उपाध्यक्ष शाहरूख खान , प्रभाग २५ चे युवक अध्यक्ष राहुल चव्हाण प्रभाग २४ चे युवक अध्यक्ष सचिन अडागळे प्रभाग २६ चे युवक अध्यक्ष स्वप्नील कसबे प्रभाग ११ चे युवक अध्यक्ष आकाश गायकवाड तसेच, अभिमान भाऊ कलाटे अविनाश शिरसाठ विशाल विनकर बापु विटकर प्रमोद यांनी परिश्रम घेतले, तसेच म्हातोबा नगर येथील किडनी बदललेल्या भरत गणेश काळे यांना कुणाल वाव्हळकर यांच्या वतीने रोख रक्कम ५००० रुपयाची मदत करण्यात आली.












