- प्रभाग रचनेच्या कामाला आयुक्तांकडून हिरवा कंदील..
- २५ सदस्यांची समिती जाहीर; तळवडेतून सुरुवात तर, जुन्या सांगवीत शेवट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२१) :- महापालिकेच्या आगामी निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एक सदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप कच्चा आराखडा तयार करण्याकरिता आयुक्त राजेश पाटील यांनी २५ प्रशासकीय सदस्यांची समिती निर्माण केली आहे. त्यामध्ये उपसंचालक, नगर रचनाकार, क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरेखक, कॉम्प्युटर ऑपरेटर आदींचा समावेश आहे.
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या नियंत्रणाखाली प्रभाग रचना तयार करणार आहेत. तळवड्यातून प्रभाग रचनेस सुरुवात होणार असून जुनी सांगवीत शेवट होणार आहे. महापालिका प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भौगोलिक क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ तसेच आवश्यकतेनुसार इतर अधिकारी यांची महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने केल्या होत्या.
त्यात नगर रचना विभागाचे उपसंचालक प्रभाकर नाळे, नगर रचनाकार प्रशांत शिंपी, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, विजयकुमार थोरात, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, बापू गायकवाड, उपअभियंता चंद्रकांत मुठाळ, सुनील अहिरे, सोहन निकम, कनिष्ठ अभियंता प्रवीण धुमाळ, अश्लेश चव्हाण, प्रसाद देशमुख, चंद्रकांत कुंभार, किरण सगर, विकास घारे, हेमंत घोड, स्वप्निल शिर्के, आरेखक नवनीत ढावरे, शमीर पटेल, रूपाली निकम, सचिन राणे या २५ जणांचा समावेश आहे.












