- प्रसिद्ध उद्योजक रमणलाल लुंकड समाजरत्न पुरस्काराने सन्मानित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२१) :- प्रसिद्ध उद्योजक रमणलाल लुंकड यांना श्रमणसंघीय सलाहकार, उपप्रवर्तक प. पु. तारकऋषीजी म.सा., डॉ. सुयोगऋषीजी म.सा. यांच्या सान्निध्यात पुणे येथे समाजरत्न पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यांनी बांधकाम क्षेत्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सकल जैन समाजाच्या वतीने आणि महावीर प्रतिष्ठानतर्फे विजयकांत कोठारी आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आला. यावेळी विलास राठोड, सुभाष ललवाणी, जुगराज पालरेचा, लखीचंद खिंवसरा, पन्नालाल लुणावत, विजय भटवरा, रमेश गुगले, गौतम बुरड तसेच लुंकड कुटुंबीय या प्रसंगी उपस्थित होते.
















