- परवानगी न घेता बेकायदेशीररित्या शहरात घुसखोरी; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चौकातील रिक्षा स्टँडवर तडीपार आरोपी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता मिळून आला.
संपूर्ण पुणे जिल्ह्यातून आरोपीला दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. तरीदेखील कोणतीही परवानगी न घेता तो बेकायदेशीररित्या शहरात आल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना सोमवारी (दि. ३०) दुपारी घडली. दिनेश विलास शिंगाडे (वय २५, रा. खराळवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई विकास जनार्धन रेड्डी (वय २७) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार हांडे तपास करीत आहेत.












