- जावयाचा सासुरवाडीत धुडगूस; पिंपळे निलखमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२१) :- मागील काही दिवसांपूर्वी पत्नी ही तिच्या माहेरी पिंपळे निलख येथे आली असता तिच्या माघारी आरोपी पतीदेखील पत्नीच्या माहेरी आला. तू आपल्या घरी चल, असे म्हणत त्याने पत्नीसोबत सोबत भांडण केले.
पत्नीने पतीसोबत जाण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने आरोपी पतीने पत्नीला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच ब्लेडने सासूच्या मानेजवळ ओरखडले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
ही घटना सोमवारी (दि. ३०) दुपारी विनायकनगर, पिंपळे निलख येथे घडली. दादा लक्ष्मण ससाणे (वय ४०, रा. वाटलुज, ता. दौंड) असे अटक केलेल्या जावयाचे नाव आहे. याबाबत विद्या दादा ससाणे (वय ३०) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एच. येडे तपास करीत आहेत.












