- स्वतःहून काढा अन्यथा कारवाईचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत पत्राशेड धारकांना यापुर्वी पत्राशेड काढुन महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ व ५५ तसेच महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमचे कलम ४७८ नुसार बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत नोटीसा देण्यात आलेल्या आहेत.
अद्यापही अनधिकृत पत्राशेड धारकांनी स्वतःहुन अनधिकृत बांधकामे काढुन /निष्कासित केले नाहीत. अनधिकृत पत्राशेड धारकांनी (दि ३० सप्टेंबर) पर्यंत स्वतःहुन अनधिकृत पत्राशेड काढुन/निष्कासित करुन घ्यावेत.
ज्या नागरिकांनी स्वतःहुन अनधिकृत पत्राशेड काढुन/निष्कासित केली नाहीत. अशा अनधिकृत बांधकाम/पत्राशेडवर बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत निष्कासनाची कारवाई करणेत येईल. या कारवाईचा खर्च संबंधित मालकांकडुन वसुल करणेत येईल. तसेच कारवाईमुळे झालेल्या नुकसानास पालिका जबाबदार राहणार नसल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.












