न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२१) :- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज बुधवारी हातगाडीवर पैशाचे बंडल ठेवून ‘धरा दाम पण करा काम’ अशा घोषणा देत पिंपरीतील आंबेडकर चौक परिसर दणाणून सोडला व शहर भाजप विरोधात आंदोलन केले.
महापालिकेत भाजपची सत्ता असून ते शहरातील असंख्य प्रश्न सोडवण्यास असफल ठरत असल्याचा आरोप यावेळी केला आहे. आंदोलनात शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे, नगरसेविका पोर्णिमा सोनवणे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, प्रवक्ते फझल शेख, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांबरोबरच महिलाही सहभागी झाल्या होत्या.