- घरगुती सिलेंडरच्या किमती पुन्हा २५ रुपयांनी वाढल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२१) :- विनाअनुदानित लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) घरगुती सिलेंडरच्या किमती बुधवारी पुन्हा २५ रुपयांनी वाढवण्यात आल्या. १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीतही प्रति सिलेंडर ७५ रुपयांनी वाढ झाली आहे.
ताज्या दरवाढीनंतर, १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत आता मुंबईत ८८४.५ रुपये आहे, पूर्वी तो ८५९.५० रुपयांमध्ये विकला जात होता. सरकारने दरमहा दर वाढवून एलपीजीवरील सबसिडी काढून टाकली. या मासिक वाढीमुळे मे २०२० पर्यंत सबसिडी काढून टाकली गेली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत गेल्या सात वर्षांत दुप्पट झाली आहे. घरगुती गॅसची किरकोळ विक्री किंमत १ मार्च २०१४ रोजी ४१०.५ रुपये प्रति सिलेंडर होती.