- म्हणाले ”माझ्यावर टीका करणारेच भविष्यात माझे कौतुक करतील”..
- राष्ट्रवादीच्या स्थायी सदस्यांची मात्र, सभेला गैरहजेरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपाचे स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांच्यावरील लाचखोरीचे आरोप व जामिनावर मुक्तता यामुळे स्थायी समितीची आज बुधवारी (दि. १) रोजी नियोजित ऑनलाइन साप्ताहिक सभा होणार की नाही कि मागील सभेप्रमाणे तहकूब केली जाणार याची उत्सुकता महापालिका वर्तुळात होती. मात्र सभापती लांडगे यांनी सभेला हजेरी लावून सर्वानाच बुचकळ्यात टाकले.
समितीच्या २५ ऑगस्ट व १ सप्टेंबरच्या सभा विषयपत्रिकेवर कोरोनासंदर्भात उपाययोजना व साहित्य खरेदी, जम्बो रूग्णालय, पाणीपुरवठा, रस्ते, स्थापत्य व वैद्यकीय विभागासह इतर विषय होते. त्यांनी शहरातील प्रमुख प्रभागातील नगरसेवकांशी सांवाद साधला. स्थायी समितीतील भाजपाचे सदस्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर प्रलंबित विकासकामे आणि स्थायी समितीच्या अजेंड्यावर असलेल्या विषयांबाबत संबंधित विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांना सूचना केल्या. पिंपरी-चिंचवड महापालिका सहशहर अभियंता, शहर अभियंता यांच्यासह प्रमुख विभातील अधिकाऱ्यांकडून सभापती लांडगे यांनी विकासकामांबाबत आढावा घेतला. रस्ते, पाणी, वीज यासह नागरी आरोग्याशी संबंधित विकासकामे मार्गी लावण्याबाबत वस्तुनिष्ठ चर्चा केली.
‘मी माजी आमदार आणि महापौर ज्ञानेश्वर लांडगे यांचा मुलगा आहे. आमच्या राजकीय जीवनात चढ-उतार नवे नाहीत. आज जे लोक माझ्यावर टीका करीत आहेत. तेच लोक भविष्यकाळात माझ्या कार्याचे कौतूक करतील. माझ्या कृतीतूनच विरोधकांना उत्तर मिळेल, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लागलेला आहे. मात्र, राष्ट्रवादीचे स्थायी सदस्य सभेला उपस्थित नव्हते.












