- राष्ट्रवादीचे सत्ताधारी भाजपला आव्हान…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२१) :- महापालिकेतील सत्ताधारी भाजप भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज (बुधवारी) महापालिकेवर मोर्चा काढत केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शहराध्यक्ष वाघेरे म्हणाले, ‘’आत्तापर्यंत आमच्या कोणत्याही स्थायीच्या सदस्याला चौकशीसाठी बोलावले नाही. जर चौकशीला बोलावले तर त्याला आमचे सदस्य सामोरे जातील. स्थायी समिती बरखास्त करण्याची आमची मागणी आहे. भाजपने त्यांच्या सदस्यांचे राजीनामे घ्यावेत. आम्ही आमच्या सदस्यांचे राजीनामे घेतो.”
कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे म्हणाले, ‘’भाजपच्या मागणीनुसार आजपर्यंतच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या नार्को टेस्टला आम्ही १०० टक्के तयार आहोत. मी स्वत: अध्यक्ष होतो. ज्यांच्या नार्को टेस्टची मागणी झाली आहे. ते एकेकाळचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते. त्यामुळे त्यांची पहिली झाली पाहिजे. माजी स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या भाजपच्या दोन आमदारांची नार्को टेस्ट झाली. तर, भाजपने साडेचार वर्षात काय कारभार केला. याचे सगळे पितळ उघडे पडेल’’.
माजी महापौर योगेश बहल म्हणाले, ‘’स्थायी समितीत राष्ट्रवादीचे सदस्य असले. तरी, भ्रष्टाचार उघडकीस यायला पाहिजे अशी आमच्या नेत्यांची भूमिका आहे. पोलिसांना पूर्ण मोकळीक दिली आहे. आमच्या पक्षाचे सदस्य असले तरी तपास पूर्ण होणार आहे’’












