- मुद्देमाल घेऊन पसार होण्याच्या आतच पोलिसांकडून अटकही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२१) :- वाकडमधील काळाखडक येथून बुधवारी (दि. १) पहाटे तीन वाजताच्या सुमारास आपला ट्रक घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून आलेला आरोपी आणि त्याच्या साथीदाराने ट्रकला दुचाकी आडवी घातली. त्यानंतर दगडाने ट्रकची काच फोडली. फिर्यादीसोबत असलेल्या इसमांना मारहाण करून खूनाची धमकी दिली.
तसेच कोयत्याचा धाक दाखवत खिशातील मोबाईल, रोख रक्कम आणि टेप असा एकूण १७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. जाताना आरोपीने हातातला कोयता हवेत भिरकावून गाडी पुढे आणली तर खल्लास करून टाकेल अशी धमकी देऊन जोरजोरात ओरडून रस्त्यावर दहशत निर्माण केली. या दहशतीला घाबरून रस्त्यावरील जाणाऱ्या लोकांनी आपल्या गाड्या घाबरून मागे वळून निघून गेले.
गस्तीवर असलेल्या वाकड पोलिसांच्या बीट मार्शलने आरोपीला ताब्यात घेतले. तर त्याचा साथीदार पळून गेला. सादिक अब्दुल सत्तार सय्यद (वय २८ रा. गुलबर्गा, कर्नाटक) यांनी बुधवारी (दि. १) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खंडू जालिंदर लोंढे (वय २४ रा. शिवराज नगर, रहाटणी) आणि त्याचा साथीदार (नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक जे. एस. गिरनार तपास करीत आहेत.