- कारचे मोठे नुकसान; दोन आरोपी गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२१) :- पिंपळे गुरव येथे कारमधून बुधवारी (दि. १) मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास जात असताना सोसायटीच्या गेटसमोर आले असता दोन्ही आरोपींनी पिस्टल सदृश हत्यार दाखवून फिर्यादीकडील एक हजार रुपये रोख रक्कम, बँकेचे आय कार्ड जबरदस्तीने काढून घेतले.
त्यांनतर फिर्यादीवर दगड उगारून फेकून मारला. मात्र फिर्यादीने दगड चुकवला असता दगड कारच्या मागील बाजूला लागला. कारची काच फुटून १० हजार रुपयांचे नुकसान झाले.
अनिकेत उर्फ उऱ्या आकाश उरणकर (वय २१, रा. मार्केटयार्ड, पुणे), विघ्नेश गुणशीलन रंगम (वय २२, रा. पिंपळेगुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत विजय त्रिंबक खेडेकर (वय ४९, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत.