- गरजूंना मोफत कार्ड उपलब्ध होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२१) :- आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत रहाटणीत मोफत कार्ड उपलब्ध होणार असुन या शाखेचे उद्घाटन नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका सविता नखाते. भाजप मावळ अध्यक्ष बाफना, राज तापकीर, युवा नेते शुभम नखाते, दगडु नखाते, दत्तात्रय नखाते, त्रिमुख येलुरे, प्रमोद राऊत, पोपट कापसे व प्रभागातील महिला बचट गट व नागरिक उपस्थित होते.












