- इतरांना कोयते, लाकडी बांबूंनी मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ सप्टेंबर २०२१) :- मयताचा १६ वर्षीय मित्र याचे आणि अल्पयीन आरोपी यांचे एकमेकांकडे खुन्नसने पाहण्यावरून वाद झाले होते. बदला घेण्याच्या हेतूने आरोपीने त्याच्या जवळील चाकूने तरुणाच्या छातीत पोटात चाकू खुपसून खून केला.
गणेश याड्रमी (वय २० वर्षे) अस खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. इतर अल्पवयीन आरोपींनी त्यांच्याकडील कोयते, लाकडी बांबूंनी मयताचे मित्र यांना मारून जखमी केले. त्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. त्यांना पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आत जेरबंद केले आहे.
अमेय उर्फ बंटी शांताराम ठाकरे (शिक्षण १० वी पास), आकाश जालिंदर गायकवाड, प्रकाश जालिंदर गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, पहिला अल्पवयीन मुलगा इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत आहे, दुसरा १० वी पास झालेला आहे, तिसरा अल्पवयीन हा १२ वी पास आहे. या तिघांचा देखील खुनाचा गुन्ह्यात सहभाग आहे. सहा पैकी तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत, त्यांना अटक करण्यात आली आहे.












