- मुलाची आईकडे जागा विकून पैशांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ सप्टेंबर २०२१) :- ‘तू राहती जागा विकून मला पैसे दे. नाहीतर मी तुला मारून टाकीन’ अशी धमकी देत आईला शिवीगाळ केली. त्यावर फिर्यादी यांनी जागा विकण्यास नकार दिला. त्यावरून आरोपीने त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.
फिर्यादी यांना वाचविण्यासाठी त्यांचा धाकटा मुलगा आला असता आरोपीने त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. ६) सकाळी देहूगाव येथे घडली.
अनुसया सुदाम मोरे (वय ६५, रा. कंदपाटील नगर, देहूगाव) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कांतीलाल, आकाश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.












