- रहाटणीत शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उभारणी..
- स्थायीच्या बैठकीत ४३ कोटी ९८ लाखांच्या खर्चास मान्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ सप्टेंबर २०२१) :- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आपत्तकालीन परिस्थिती व कोरोनाच्या अटकावासाठी आपत्तीजनक स्थितीचा सामना करण्याकामी औषधे आणि साहित्यांची तातडीने आवश्यकता आहे. त्यांचे खरेदीकामी येणा-या ४५ लाख १ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच कै. अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जंबो कोविड रुग्णालयातील १४० बेड आणि इतर बेड सुरु ठेवणेबाबत मुदतवाढ देण्यात आली असून त्याकामी येणा-या १ कोटी ४२ लाख इतक्या खर्चाचही मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर किमान वेतन कायदयानुसार ३६ कामगार व २ सुपरवायझर यांचे तीन महिने कालावधीकरीता येणा-या २९ लाख ४७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली, अशी माहिती पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बुधवारी (दि. ८ सप्टेंबर) झालेल्या ऑनलाईन बैठकीच्या अध्यक्षस्थानी ॲड. नितीन लांडगे होते. या बैठकीत एकूण विविध विकास कामांसाठी येणा-या एकूण ४३ कोटी ९८ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक २३ मधील हेडगेवार पुल ते कुणाल रेसीडेन्सी पर्यंत जाणारा १२ मीटर रुंद रस्ता विकसीत करण्याकामी येणा-या ४४ लाख २० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक २७ रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारणे आणि अनुषंगीक कामे करण्याकामी येणा-या १ कोटी ९२ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
टाटा मोटर्स रस्ता भोसरी ते थरमॅक्स चौक रस्ता सुशोभिकरण व मध्यदुभाजक उद्यान विषयक कामाची देखभाल करण्याकामी येणा-या १ कोटी २२ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. ‘क’ आणि ‘ई’ क्षेत्रिय कार्यालयातील रस्ते मध्य दुभाजक सुशोभिकरण देखभाल करण्यासाठी येणा-या ७१ लाख ७७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. वैद्यकीय विभागाच्या वापराकरीता ब्लड मोबाईल कलेक्शन व्हॅनचे मनपा स्पेसीफिकेशनप्रमाणे चॅसी खरेदी करण्यासाठी येणा-या ३७ लाख १० हजार अधिक सेवाकर इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.