- भोसरीतील सद्गुरुनगरमधील घटना; आरोपीवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२१) :- भोसरीतील सद्गुरुनगर येथे रस्त्याने पायी चालत जात असताना आरोपी रस्त्यात अगोदरच थांबला होता. फिर्यादीनी आरोपीच्या विरोधात यापूर्वी पोलिसात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांना अडवले.
शिवीगाळ करत ‘तुला लय माज आलाय’ असे म्हणत हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपीने लाकडी बांबू फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. यानंतर आरोपी फिर्यादी यांना शिवीगाळ करत तसेच धमकी देऊन निघून गेले. ही घटना गुरुवारी (दि. ९) सकाळी घडली.
शकील जलील शेख (वय २७, रा. सद्गुरूनगर, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आदर्श जगताप ऊर्फ कुक्या (वय अंदाजे २४) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.