- दीडशे जणांना टू व्हीलर लायसन्स; नगरसेविका अनुराधा गोरखे यांचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ११ सप्टेंबर २०२१) :- भाजप नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग १० मधील दत्तनगर, विद्यानगर, लालटोपी नगर, इंदिरा नगर, टिपूसुलतान नगर मोरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर परिसरात गरजू व गरीब विद्यार्थ्यांना पाच हजारपेक्षा जास्त वह्यांचे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन वाटप करण्यात आले.
दरम्यान दीडशे लाभार्थ्यांना टू व्हीलर लर्निंग लायसन्सही अत्यंत माफक दरात देण्यात आले. तसेच परिसरात वृक्षारोपण, अनाथालयाला मदतही करण्यात आली.
यावेळी अ प्रभाग अध्यक्षा व नगरसेविका शर्मिला बाबर, नगरसेविका कमल घोलप, माजी उपमहापौर तुषार हिंगे, भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, बी के कोकाटे, सय्यद पटेल, आरपीआयचे दादा शिरोळे, राम शिरोळे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अजित भालेराव, संभाजी नाईकनवरे, राम लोंढे, अमोल कुचेकर, मिलिंद कांबळे, नागेश राठोड, विशाल पवार, अविनाश शिंदे, ओंकार गायकवाड, निलेश सोनावणे, प्रशांत शिंदे, प्रीतम तेलंगे यांनी मेहनत घेतली.