- पोलिसांकडून आरोपीला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ११ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण हद्दीतून तडीपार केलेल्या आरोपीने तडीपार आदेशाचा भंग करत हातात तलवार घेऊन हवेत नाचवत दहशत निर्माण केली.
तसेच, ‘मी भाई आहे इथला’ असे म्हणत शिवीगाळ केली. चिंचवडगावातील पागेची तालिम येथे शुक्रवारी (दि. १०) साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. विकी अनिल घोलप (वय २४, रा. पागेची तालिम, चिंचवडगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकाचे पोलीस शिपाई शुभम तानाजी कदम यांनी शुक्रवारी (दि. १०) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.