- महिला आत्महत्येच्या तयारीत; पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ११ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील एका डॉक्टर महिलेचा फोटो आणि मोबाईल नंबर हा कॉलगर्ल नावाने एका वेबसाईटवर टाकला होता. गूगलवर कॉलगर्ल असे सर्च करताच संबंधित महिलेचा फोटो आणि मोबाईल नंबर येतो, असे पोलिसांनी सांगितले.
या महिलेला त्याबाबत अनेक फोन आले आहेत. यामुळे ही महिला तणावात होती. वैतागून तिने शनिवारी दुपारच्या सुमारास आत्महत्या करत असल्याचा मेसेज संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना केला होता. याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे आणि महिला पोलीस अधिकारी कविता रुपनर यांना देण्यात आली.
दोघांनी तातडीने घटनास्थळी जाऊन डॉक्टर महिलेची दोन तास समजूत काढून तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. तो मोबाईल नंबर आणि फोटो काढण्यासाठी पत्र देण्यात आलं आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. या महिलेने सायबर पोलिसात तक्रार दिली असून कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.