- सांगवी पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन पालकांच्या केले स्वाधीन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ११ सप्टेंबर २०२१) :- सांगवीत राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी शुक्रवारी घरातून कोणाला काही न सांगता निघून गेली होती. घरातील लोकांनी शोध घेतला. सोसायटीमधील सीसीटीव्हीत मुलगी सॅगसह बाहेर जात असल्याचे दिसले. ती वाकड येथून ट्रॅव्हसलने मुंबईला गेली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांना मिळाली.
त्यांनी संबधित ट्रॅव्हल्सशी संपर्क साधत त्या मुलीविषयी माहिती मिळवून ओळख पटवली. मुलगी खारघर येथे उतरली असल्याची माहिती ट्रॅव्हल्स चालकाने दिली. रात्री अकराच्या सुमारास खारघर येथील एका हॉटेल जवळ मुलगी थांबली असल्याचं निदर्शनास आले. तात्काळ तिच्याशी बोलून खारघर पोलिसांनी सांगवी पोलिसांना याची माहिती दिली.
सांगवी पोलिसांनी व्हिडिओ कॉलद्वारे तुमची मुलगी सुरक्षित असल्याची खात्री पालकांना करून दिली. ही मुलगी इयत्ता सातवीत शिकत असून तिला भटकंतीची आवड आहे. त्यावर तिला पुस्तक लिहायची इच्छा आहे. कोणाला न सांगताच घरातून जाण्याचा निर्णय तीन घेतला, अशी माहिती समजली.