- पोलिसांनी सापळा रचून दोघांना केली अटक; मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ११ सप्टेंबर २०२१) :- पिंपळे निलखमध्ये मोबाईल शॉपी चोरीचा प्रकार घडला होता. त्या घटनेतील आरोपी हे कोकणे चौक याठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. ८) सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले.
त्यांच्याकडून महागडे मोबाईल तसेच ॲक्सेसरीज आणि एक ऑटो रिक्षा असा एकूण ४ लाख ९६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कमलेश चंद्रकांत रणपिसे (वय २३, रा. भीमनगर कामशेत, मुळशी) आणि तुषार नितीन डुकरे (वय २०, रा. मिलिंद नगर, पिंपरी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना पुढील तपासासाठी सांगवी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.