न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२१) :- किवळेत धारदार शस्त्राने डोक्यात वार करून मजूर महिलेचा निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १६) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे.
सौदव सोमेरू उरव (वय ४०, सध्या रा. किवळे, मूळ रा. पश्चिम बंगाल), असे खून झालेल्या मजूर महिलेचे नाव आहे. मयत महिला पतीसह किवळे येथे राहत होती. तिचा भाचा देखील त्यांच्यासोबत राहत होता.
सकाळी पती आणि भाचा नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्यानंतर महिला देखील जवळच असलेल्या बांधकाम साईटवर कामाला गेली. दरम्यान, सायंकाळी महिला कामावरून घरी आली नसल्याने पतीने जाऊन पाहणी केली असता महिलेचा खून झाल्याचे समोर आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.