न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२१) :-देशातील वाढती बेरोजगारी व त्यामुळे होत असलेले तरूणांचे हाल व दुर्दशा पाहता आज युवक काँग्रेस कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन राष्ट्रीय स्तरावर बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकार विरोधात “मी बेराजगार कोण जबाबदार” आंदोलन केले.
यावेळी बेरोजगारीची गंभीर समस्या व त्याचे सामाजिक दुष्परिणाम याबाबत केंद्र सरकारला जाब विचारण्याबाबतची पत्रके वाटण्यात आली. या प्रसंगी युवकांकडून प्रतिकात्मक स्वरूपात हातगाडीवर केळी व नारळ विक्री करत तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. नागरी अपेक्षांबाबत मोदी सरकारने नागरिकांना नैराश्य दिले याबाबत हातात केळी घेऊन युवकांनी प्रतिकात्त्मक निषेध नोंदवला.
या प्रसंगी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एन एस यु आय चे शहराध्यक्ष डॅा. वसीम ईनामदार, युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे, जिल्हा सरचिटणीस रवी नांगरे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष सौरभ शिंदे आदी उपस्थित होते.












