- त्यांच्या जागी वेटिंग यादीतील लाभार्थ्यांना प्राधान्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२१) :- चिखली प्राधिकरण येथील घरकूल योजनेसाठी प्राधान्य यादीतील ३७२ लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. स्व हिश्श्याची रक्कम ३१ मार्च २०२१ पर्यंत न भरल्यामुळे ते लाभार्थी अपात्र ठरले आहेत.
४५६ जणांना महापालिकेने रक्कम भरण्याबाबत नोटिस बजावली होती. मात्र त्यापैकी केवळ ८४ जणांचीच रक्कम भरली आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपासून रक्कम न भरणाऱ्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
पिंपरी – चिंचवड महानगरपालिका जेएनएनआरयुआरएम अभियानांतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी से.नं. १७ व १९ चिखली प्राधिकरण येथे घरकुल योजना राबवली आहे. २३ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या सोडतीनुसार पात्र लाभार्थी यांची यादी निश्चित करुन प्राधान्य यादीमधील लाभार्थी यांना उर्वरीत स्वहिस्सा भरणेसंबंधी वेळोवेळी मुदतवाढ दिली. परंतु प्राधान्य यादीतील ३७२ लाभार्थी यांनी अद्याप उर्वरीत स्वहिस्सा रक्कम भरलेली नाही, अशा लाभार्थीची यादी पिंपरी – चिंचवड महानगरपालिका झोनिपु विभागाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली होती. वेटिंग यादीमधील इतरांचा त्यासाठी विचार केला जाणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.












