- प्रशासन अधिकारीपदी शीतल वाकडे यांची नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी रविकिरण घोडके यांना प्रतिनियुक्तीने पदस्थापना देण्यात आली आहे. तसेच शीतल वाकडे यांची पिंपरी महापालिकेच्या प्रशासन अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी तसा आदेश काढला आहे.
घोडके हे ग्रामविकास विभागात गटविकास अधिकारी वर्ग एक या पदावर राज्य शासनाच्या सेवेत होते. तर, वाकडे या चंद्रपूर महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत होत्या.
















