न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२१) :- भोसरी एमआयडीसी येथील ‘महाजन एंजरप्राईज’ या कंपनीच्या गेटवरुन अज्ञात चोरटे कंपनीत शिरले. कंपनीमधील तीन लाख १९ हजार ९८४ रुपयांचे मटेरियल चोरट्यांनी चोरून नेले.
ही घटना १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान कंपनीत घडली. मिलिंद नारायण महाजन (वय ५८, पाषाण, पुणे) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















