- भोसरीतील घटना; पती, सासू, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२१) :- आरोपींनी आपसात संगनमत करून रत्नागिरी येथे घर बांधण्यासाठी तसेच घरखर्चासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी केली. विवाहितेवर बुवाबाजी करून तिला कोंबडीचे रक्त पाजले. आरोपी सासऱ्याने विवाहितेशी लगट करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला.
पतीकडे इंजिनिअरिंगची डिग्री असल्याचे लग्नाच्या वेळी सांगण्यात आले होते. मात्र त्याचे डिग्री पर्यंतचेही शिक्षण झालेले नाही. पती लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे माहिती असूनही सासू आणि सासऱ्याने त्याचे लग्न पीडित विवाहितेसोबत लावून फसवणूक केली. पतीच्या लैंगिक असक्षमतेबाबत विवाहितेने तिच्या आई, वडील व नातेवाईकांना सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी विवाहितेला मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना ३० डिसेंबर २०१८ ते १९ जून २०२१ दरम्यान भोसरीत घडली. याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्याच्या विरोधात स्त्री अत्याचार, विनयभंग, जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने रविवारी (दि. १९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व समुळ उच्चाटन कायदा कलमनुसार पती (वय ३३), सासरा (वय ६२), सासू (वय ५३) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.