- आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२१) :- सांगवीत योगा प्रशिक्षक असणाऱ्या विवाहितेनं ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. विशाखा दीपक सोनकांबळे (वय ३७, रा. सांगवी), असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे.
विशाखा या त्यांचे पती, मुलगा व सहा वर्षांची मुलगी भाडेतत्वावरील फ्लॅटमध्ये रहात असून, रविवारी रात्री विशाखा यांनी बेडरुममध्ये डाव्या हाताची शीर कापली. त्यानंतर ओढणीच्या साह्याने पंख्याला गळफास घेतला. पती सकाळी झोपेतून जागे झाले असता बेडरुममध्ये गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान सोनकांबळे यांच्या घरातील डायरीवर रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी डायरी ताब्यात घेतली. आत्महत्येचे कारण अद्याप समजे शकलेले नाही. शहरातील सौंदर्यवती स्पर्धेत त्यांनी सौंदर्यवती म्हणून बहुमान पटकावला होता.