- चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक मतदार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात आजमितीस एकूण १३ लाख ३८ हजार २७ मतदार आहेत. चिंचवडमध्ये सर्वाधिक साडेपाच लाख मतदार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मतदार नावनोंदणी सुरू असल्याने मतदार संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
शहरात पिंपरी चिंचवड आणि भोसरी असे एकूण ३ विधानसभा मतदारसंघ येतात. भोसरी मतदारसंघात एकूण ४ लाख ५१ हजार ३५७ मतदार आहेत. चिंचवडमध्ये सर्वाधिक ५ लाख ५२ हजार ८६८ मतदार आहेत. पिंपरीत ३ लाख ५७ हजार ८१२ मतदार आहेत, तर सध्या शहरात एकूण १३ लाख ३८ हजार २७ मतदार आहेत.
सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शहरात एकूण ११ लाख ९२ हजार ८९ मतदार होते. त्यात पुरुष मतदार ६ लाख ४० हजार ६९६ तर, महिला मतदार ५ लाख ५१ हजार होते. मागील वेळेच्या तुलनेत यंदा १ लाख ४५ हजार ९३८ मतदार अधिक आहेत.