- माजी महापौर राहुल जाधव यांचा पुढाकार; आ. महेश लांडगे यांची प्रमुख उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर, विद्यमान नगरसेवक राहुल जाधव व दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन मंगल जाधव यांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते जाधववाडी प्रभाग क्रमांक दोनमध्ये तब्बल १ हजार ३५० नागरिकांना आयुष्मान भारत कार्डचे मोफत वितरण करण्यात आले.
यावेळी विजय फुगे, कविता हिंगे, नीलेश बोराटे, संगीता भोसले, सोनम जांभूळकर, अभिजीत गाडे, रोहित तळेकर, किशोर भुजबळ, राजेश जाधव, नंदकुमार जाधव, पप्पू जाधव, रवींद्र जांभूळकर, प्रताप भांबे, महेंद्र मंडलिक, चिंतामणी शिंदे, खंडू वाळुंजकर मारुती जांभुळकर आदी मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते.
दरम्यान आ. महेश लांडगे यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विविध लोकोपयोगी योजनांची उपस्थित नागरिकांना माहिती दिली. राहुल जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.