- नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्या पुढाकाराने कामगाराला मिळाला न्याय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२१) :- चाकण येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करताना, प्रेस मशीनमध्ये हात अडकून झालेल्या दुर्घटनेत कामगाराची हाताची बोटं गेली. कर्मचाऱ्याला मदत करण्यास कंपनी व्यवस्थापन आणि कंत्राटदाराने टाळाटाळ केली. नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी पुढाकार घेत कामगाराला न्याय मिळवून दिला.
आळंदी येथील कृष्णा सोनवणे हे उत्तम मृदुंग वादक आहेत. कोरोना नियमांमुळे गेल्या दोन वर्षापासून काकडा आरती, सप्ताह, कीर्तन यांसारख्या कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे मृदुंग वादन करून उदरनिर्वाह करणाऱ्या कृष्णावर बेरोजगार होण्याची वेळ आली. खासगी कंपनीत काम करण्याचा निर्णय घेतला.
कंपनीमध्ये काम करताना, प्रेस मशीनमध्ये हाताची बोटे जाऊन अपघात झाला. या दुर्घटनेत कृष्णाची बोटे मात्र गेली. कंपनी व्यवस्थापन आणि कंत्राटदार यांनी जखमी कृष्णावर उपचार करण्यासाठी खर्च देण्यास टाळाटाळ करत हात वर केले. प्रवीण भालेकर आणि चंद्रशेखर कडलग यांनी जखमी कर्मचाऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी केली. यानंतर कंपनी प्रशासनाने मदतीचा धनादेश सुपूर्द केला.