- आरोपीला दिला जमीन; आरोपींवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२१) :- आपसांत संगनमत करून अंकुश सुदाम चौधरी (वय २५, रा. गजानन महाराज नगर, पिंपळे गुरव) हे बनावट नाव धारण करून तसेच या नावाचा सातबारा, आधारकार्ड आणि रेशनिंगकार्ड तयार केले. ही कागदपत्रे बनावट असल्याचे माहिती असूनही आरोपींनी वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडे सादर केली.
महेश कालिराणा याला जामिनदार राहून शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना १२ मे २०२१ रोजी वाकड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात घडली. पोलीस नाईक नाना बापू झेंडे यांनी सोमवारी (दि. २०) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महेश हनुमानराम कालिराणा (वय १९, रा. मोरया पार्क लेन, पिंपळे गुरव), सलमान ताजुद्दिन मुजावर (वय २४, रा. जयभीमनगर, दापोडी) आणि त्याचे इतर साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.