- परभणीतील आरोपीला मुद्देमालासह घटनास्थळी अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२१) :- बनावट नोटा असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सोमवारी (दि. २०) रोजी इंद्रायणीनगर येथे सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन हजार रुपये किमतीच्या ४० बनावट नोटा आढळून आल्या.
या नोटा बनावट असल्याचे माहिती असूनही त्याने त्या खऱ्या भासवून चलनात आणण्याचा प्रयत्न केला. आरोपीकडून रोख सहा हजार ५७० रुपये, सहा लाख रुपये किंमतीची कार असा एकूण सहा लाख सहा हजार ५७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई एस. ए. जाधव (वय ३२) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदिप पंढरीनाथ पांचाळ (वय ३६, रा मु. वडगाव, पो. भारसवाडा, ता. जि. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.