न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- अवघ्या ४०० मतांच्या फरकाने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत थेरगावचे प्रतिनिधित्व करताना पराभव झालेले भाजपचे वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य संभाजी बारणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी संभाजी बारणे यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उद्योजक अभय मांढरे, नगरसेवक कैलास बारणे, संतोष बारणे आदी उपस्थित होते.
अद्याप ९ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.