- मुलाकडे पैसे मागितल्याच्या रागातून नातवाकडून नीच कृत्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- वडिलांनी त्यांच्या मोठ्या मुलाला उसने पैसे दिले होते. ते पैसे मुलाला परत मागितले. या कारणावरून नातवाने आजोबाना वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नातवाने आजोबाच्या डोक्यात लोखंडी कठीण वस्तूने मारले.
आजोबाच्या डोक्यास मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. हा प्रकार बुधवारी (दि. २२) रात्री महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी येथे घडला. माणिकराव नरसिंगराव कळसे (वय ७६, रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी) असे जखमी आजोबांचे नाव आहे.
त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल गोविंद कळसे या नातवावर गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.