न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात प्लास्टीक वापरावर बंदी असतानाही त्याचा वापर करणा-यांविरुध्द पालिकेने कारवाईची मोहिम सुरु केली आहे.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली ‘ क ‘ प्रभागामध्ये शुक्रवारी (दि. २४) रोजी प्लास्टिक बंदी व नॉन कंपोस्टिंगसाठी १० हजार रुपये व नॉन कंपोस्टिंगसाठी ५ हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
या कारवाईत आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय दवाले, शांताराम माने, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, वैभव कंचनगौडा सहभागी झाले होते.