- करोना काळातील सामाजिक कार्याचे राज्यपालांकडून कौतुक..
- संपूर्ण कुटुंबासह बारणे यांचा उत्तराखंड राज्याकडून सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- उत्तराखंड राज्याचे नवनियुक्त राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांनी नुकतीच राजभवनात उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमाला महाराष्ट्रातून कर्तव्यम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बारणे यांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
बारणे यांच्या कर्तव्यम सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल राज्यपालांनी बारणे यांचे कौतुक केले. या शपथविधी सोहळ्यात, महाराष्ट्र राज्यातील पिंपरी चिंचवड शहरातील कर्तव्यम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बारणे आणि लेखक क्रांतिकुमार महाजन यांचा संपूर्ण कुटुंबासह सन्मान करण्यात आला. यावेळी लेखक क्रांतिकुमार महाजन, आशा महाजन, माधुरी बारणे, हरभजनसिंग अरोरा, जसविंदरसिंग अरोरा (झारखंड), योगमाता राजेश्री देसाई (गुजरात), आशिष श्रीवास, प्रशांत साहेत, प्रति साहेत, प्रार्थना बारणे आदी उपस्थित होते.
संतोष बारणे म्हणाले, उत्तराखंड राज्याचे नवनियुक्त राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग यांच्याकडे राज्यपाल म्हणून मोठे व्हिजन आहे. त्यांनी शपथ घेताना सांगितले की, राज्यातील महिला स्वयंपूर्ण आणि शूर आहेत, मुलींना सैनिक शाळा एनडीएसाठी प्रेरित करून राज्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला गेला.