- पिंपरी चिंचवडमधून कोणाला मिळणार संधी?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२१) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पुणे महानगर नियोजन समितीच्या ३० सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारांना बुधवारपासून (दि. २९) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. मतदान दि. १० नोव्हेंबर २०२१ रोजी, तर मतमोजणी दि. १२ नोव्हेंबरला होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये ‘ पीएमआरडीए ‘ हद्दीतील ग्रामीण भाग (जिल्हा परिषद), लहान नागरी क्षेत्र (नगरपरिषद) आणि मोठे नागरीक्षेत्र (महानगरपालिका) गटातून एकूण ३० सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यात पुणे व पिंपरी – चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांमधून २२ सदस्य, ग्रामीण भागातून ७ तर नगरपरिषद क्षेत्रातून १ एक सदस्य अशा एकूण एकूण ३० सदस्यांचा यात समावेश असेल.
महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये पीएमआरडीएच्या हद्दीतल्या ग्रामीण (जिल्हा परिषद), लहान नागरी क्षेत्र (नगरपरिषद) आणि मोठे नागरी क्षेत्र (महानगपालिका) गटातून एकूण ९७८ मतदार आहेत. यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत मिळून २८५ मतदार आहेत. सोबतच नगर परिषदांमध्ये ११४ तर ग्रामीण भागामध्ये ५७९ मतदार आहेत.